पायाभूत/संकलित चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत
वर्गाचे शेकडा प्रमाण
मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.
सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
--------------------------------------------------------
वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण
उदा. शाळेचा 4 थी चा पट 16 आहे.
16 विद्यार्थ्यांच्या भाषा विषयाच्या गुणांची बेरीज 505 आहे. 4 थी साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.
505× 100
------------------
16 × 40
50500
= -----------
640
= 78.9 %
शाळेचे शेकडा प्रमाण
विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.
सर्व वर्गांच्या शेकडा प्रमाणाची सरासरी काढावी.
उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण
2 री - 72%
3 री - 85.5%
4 थी - 91%
शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =
72 + 85.5 + 91
---------------------------
3
= 82.83
असेच गणित विषयासाठी करावे.
शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.
मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
---------------------------------------------
2
उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.
82.83 + 92.5
--------------------
2
= 87.66%
आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.
81 ते 100 - अ
61 ते 80 - ब
41 ते 60 - क
0 ते 40 - ड
संकलित चाचणी चा निकाल विषय निहाय श्रेणीनुसार तयार करावयाचा आहे .त्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत.
पायाभूत/संकलित मुल्यमापन श्रेणी तक्ता
इ. १ ली २ री
अ —25 ते 30 गूण
ब — 19 ते 24 गुण
क — 13 ते 18 गुण
ड — 1 ते 12 गुण
*********************
इयता ३ री ४ थी
अ — 33 ते 40 गूण
ब — 25 ते 32 .गुण
क — 17 ते 24 गुण
ड — 1 ते 16 गुण
*********************
इयता ५ वी ६ वी
अ — 41 ते 50 गुण
ब - 31 ते 40 गुण
क — 21 ते 30 गुण
ड — 1 ते 20 गुण
*********************
इयता ७ वी ८ वी
अ — 49 ते 60 गुण
ब — 37 ते 48 गुण
क — 25 ते 36 गुण
ड — 1 ते 24 गुण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा